
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील चिखली बेडा येथील पाच वर्षीय बालिका प्रिया वशिंदर पवार ही खेळत असताना मालवाहू महिंद्रा मॅक्सिअम गाडी क्रमांक एम एच २७ एक्स ६४७४ ही गाडी चालक रिव्हर्स घेत असताना बालिका मागच्या चाका मध्ये जागीच ठार झाली ही घटना दिं २४ मे २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान चिखली बेडा येथे घडली आहे.
प्रिया ही बालिका खेळत असताना बेड्यावर घरासाठी सेन्ट्रीग घेवून आलेली मालवाहू गाडी रिव्हर्स घेत असताना खेळणारी बालिका चालकाच्या लक्षात न आल्याने हा अपघात घडला यावेळी बालिकेचे आई- घरी व वडील हे राळेगाव येथे बाजाराला आले होते. बालिका एकटी मात्र बाहेर खेळत होती तेव्हा अपघात घडला दरम्यान चालकास राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून बालिका जागीच ठार झाल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला आहे.
