आदर्श विवाहाची जिल्हाभरात चर्चा ,मुलगी पाहण्यासाठी आले लग्न लावून गेले

पुसद तालुक्यातील पारवा खुर्द येथील आदर्श विवाह

सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण पवार आणि राठोड परिवारातील सदस्य तथा शेतकरी दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्‍यक खर्चाला फाटा देत “चट मंगनी पट ब्याह’ करून बंजारा समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.
पुसद तालुक्यातील पारवा खुर्द येथील सखाराम गोपाळ पवार यांची कन्या शिवानी वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव येथील दीपक राठोड यांचा मुलगा विकास हे मुलीला पाहण्याकरता आले असता मुलगी पसंत झाल्यावर नवरदेवाचे काका दिलीप राठोड पोहारा देवीचे महंत नरेश राठोड यांनी वधू वरच्या पक्षाकडील लोकांची बोलणी करून जगभंगणी शादी चा निर्णय घेतला.
दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला. सकाळी 10 वाजता सोयरीक झाली आणि दुपारी 3 वाजता आणि अवघ्या पाच तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्‍या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत पद्धतीने विकास आणि शिवानी विवाहबद्ध झाले. यावेळी नरसिंग जाधव डॉ. प्रेमसिंग राठोड. मंगू नाईक. आत्माराम राठोड. विठ्ठल चव्हाण. पुरुषोत्तम पाटील. राजू राठोड.रामराव राठोड. विठ्ठल पवार .उत्तम महाराज .रामदास महाराज .जोशना पवार. प्रमिलाताई चव्हाण. वनिता राठोड. सुरेश राठोड, उपस्थित होते