
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागातील नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले नथु बेंडे हे ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले असून सेवनिवृत्तीच्या दिवशी रविवार येत असल्याने त्यांच्या सेवनिवृत्तीबद्दल संजय गांधी निराधार विभागातील कर्मचारी यांनी दिं २८ जून २०२४ रोज शुक्रवारला बेंडे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी नायब तहसीलदार नथु बेंडे यांनी सांगितले की कार्यालयात येणार्या लोकांचे कामचांगले करा. काम करताना संयम ठेवा एकमेकाबध्दल सहानुभूती ठेवा. मला येथे काम करताना आपल्या संजय गांधी विभागातील सर्वाचे चांगले सहकार्य मिळाले असे त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित कर्मचारी स्नेहा राऊत,श्रीलेखा भगत,माधुरी घाटोळे, कल्पना मेश्राम, दिलीप राजूरकर, आकाश खाके, मंडळ अधिकारी महादेव सानप,पत्रकार राष्ट्रपाल भोंगाडे,विनोद माहूरे आदी उपस्थित होते.
