केंद्र शासनाच्या विविध योजना ऊमेदसमूहातील महिला करिता फायदेशीर : रामदास ईटकरे तालुका कक्ष अधिकारी उमरखेड

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

केंद्र शासनाच्या विविध योजना या शेतकऱ्याकरीता, गरजू लोकांकरीता तयार करण्यात आल्या असून या योजना गरिबांच्या कल्याणाकरीता असून, या योजनांचा लाभ सामान्य महिलांना सुद्धा झाला आहे, यामध्ये शेतकयांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गरजू महिलांना धूर आणि त्रास कमी होण्याकरिता उज्वला पोजना, शौचालय सुविधा, पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान यांचेसह विविध योजना लाभदायक असून, यामधून बचत गटांना सक्षम करण्याकरिता विविध प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, उमेद मधील महिला विविध योजनाची लाभ घ्यावा असे प्रतिपादन उमेद अभियानाचे तालुका कक्ष अधिकारी श्री रामदास इटकरे यांनी केले. ते मानव विकास योजनेअंतर्गत शेळीपालन आणि शेड यांच्या आढावा घेण्यासाठी उमेद कार्यालय उमरखेड येथून माननीय रामदास इटकरे , वाढवे सर , निघणार प्रभाग समन्वय तसलीम शेख सर आणि यवतमाळ येथून संतोष कोरडे सर यांनी पिरंजी येथे भेट घेऊन पिरंजी येथे महिलांना मार्गदर्शन केले व पिरंजी येथील सर्वसमूहातील महिला आय सी आर पी लता रोकडे पशु सखी प्रणीता भिसे कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते