
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
ओम नमो नगर वडगाव येथे आज दिनांक 24/7/2024 रोज बुधवारी ला सकाळी साडेनऊ वाजता सर्व नागरिकांच्या उपस्थितीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली प्रथमता शिवलिंग. पिंडीचा पंचामृत टाकून अभिषेक करण्यात आला त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी शिवलिंग पिंडी चे पूजन केले पूजन. आटोपल्यानंतर श्री विठ्ठलराव उपरीकर यांच्या हस्ते शिवलिंग पिंडीची स्थापना करण्यात आली सर्व मंत्रविधी. मध्ये.शिवलिंग पिंडीची स्थापना करून राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे कार्यकारणी. श्री अशोकराव चव्हाण ओम नमो नगर वडगाव. यांच्या हस्ते सर्व संत प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व ओम नमो नगर येथील भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच राष्ट्रसंत विचार मंच संघटनेच्या संचालिका सौ ताई देशमुख पण. आवर्जून.हजर होत्या त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्या सौ अश्विनीताई पडधान. उपस्थित होत्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवलिंग पिंगाची स्थापना करून. राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता अध्याय पहिला देवदर्शन या अध्यायाचे वाचन करून सर्व संत प्रतिमेचे पूजन केले. पूजन आटोपल्यानंतर सर्व महिला मंडळांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप केला जब आटोपल्यानंतर महिला मंडळांनी शंकराची आरती केली आरती आटोपल्यानंतर सर्वांनी पूजन करून तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम पार पाडला शेवटी राष्ट्रसंत विचार मंच संघटनेच्या संचालिकासह जयाताई देशमुख यांनी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा त्रिवार जयघोष. घेऊन हर हर महादेव म्हणून कार्यक्रमाची सांगता केली
