पक्षाचे काम जोमाने करून विधानसभेत आमदार निवडून पाठवा : निरीक्षक अशोक बोबडे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशान्वये दिनांक 31/7/2024 रोज बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा कमेटी निरीक्षक अशोक बोबडे व अतुल राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काॅंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अरविंद वाढोणकर यांनी करून तालुका काँग्रेस पक्षाच्या चालत असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. आणि समाधान व्यक्त केले. त्यानंतर पक्षाचे सहनिरीक्षक अतुल राऊत यांनी पक्षाच्या चालत असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली सोबतच लोकसभेत मिळालेल्या यशामुळे राळेगाव तालुकावासियाचे धन्यवाद मानले ‌त्यासोबतच काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा जेष्ठ निरीक्षक अशोक बोबडे यांनी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील कार्याबद्दल समाधान करून पुढे विधानसभेत सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून पाठवण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आढावा बैठकीचे अध्यक्ष कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सरांनी शासनाच्या चालत असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली आणि आणि लोकसभेत खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले सोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांसाठी प्रयत्न करून निवडून आणायचे आहे असे सुतोवाच केले.या आढावा बैठकीचे सुत्रसंचलन कांग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी आभार मानले. त्यावेळी या आढावा बैठकीला नगराध्यक्ष रविंद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांच्या सह नगरपंचायतीचे पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, वसंत जिनिंगचे सर्व पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे संचालक,ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य, राळेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांच्या सह तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.