
यवतमाळ – शिवभक्त श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शिवाची श्रद्धापूर्वक उपासना करतात. शास्त्र समजून शिवोपासना केल्यास उपासकाची भावभक्ती अधिकच वृद्धींगत होते, आणि त्याचा अधिकाधिक लाभ उपासकाला होतो. शिवोपासनेत प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घेण्यापासून ते शिवपूजा करण्यापर्यंत अनेक कृतीचा समावेश होतो. शिवभक्तांना श्रावण सोमवारचा अध्यात्मिक स्तरावर पुरेपूर लाभ व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने 5, 12, 19, 26 ऑगस्ट या दिवशी यवतमाळ आणि दिग्रस येथे शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन कक्ष लावण्यात येणार आहे, त्यामध्ये शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र, शिवाला बेल वाहने, शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा घालणे, शृंगदर्शन कसे घ्यावे? महाशिवारात्रीचे व्रत कसे करावे? इत्यादी, तसेच आयुर्वेदिक वन्औषधी, बालसंस्कार, भाषासंवर्धन, राष्ट्र धर्म, अध्यात्म, साधना, स्वभावदोष अहंनिर्मूलन प्रक्रिया, गुरुकृपायोगनुसार साधना, आनंदी जीवन कसे जगावे?, यासंदर्भात ग्रंथ उपलब्द असणार आहेत, तसेच देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, जपमाळ, भीमसेनी कापूर,सात्विक उदबत्ती व कुंकू इत्यादी पूजोपयोगी साहित्य वितरणासाठी उपलब्द असणार आहे.
ग्रंथ प्रदर्शन पुढील ठिकाणी असणार आहे,
1) श्री केदारेश्वर मंदिर, यवतमाळ (स.7 ते रात्री 9),
2) श्री कमलेश्वर मंदिर, लोहारा(स.7 ते रात्री 8 )
3)श्री पाळेश्वर मंदिर,दिग्रस( दुपारी 3.30 ते 5.30)
वरील दिलेले ग्रंथ कक्ष मिळण्यामध्ये अडचण आल्यास 9970752507 या क्रमांकावर संपर्क करावा.
या शिवविषयक ग्रंथ प्रदर्शनीचा शिवभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी अरुण देशमुख
