
सहसंपादक ,: रामभाऊ भोयर
राळेगांव :– स्वस्त धान्याचे वितरण सुलभ व्हावे यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे शासनाने संगनीकीकरण केले मात्र रास्त दुकानदारांना देण्यात आलेल्या फोर जी ई पास मशीनमध्ये वारंवार तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने राळेगांव तालुक्यातील रास्त दुकानातील धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाल्याने शिधा धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यासाठी राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने आज दिं ७ ऑगष्ट २०२४ रोज बुधवारला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून तालूक्यातील रास्त शिधा धारकांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.
राज्यात २०१८ पासून ई पास मशीन द्वारे धान्य वितरित करण्यात येत होते मात्र सुरवातीला रास्त दुकानदारांना ई पास मशीन देण्यात आल्या होत्या त्या ई पास मशीन च्या त्रासापोटी रास्त दुकादारांनी नवीन ई पास मशीन देण्यात याव्या यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली .त्यानंतर शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी फोर जी ई पास मशीन रास्त दुकानदारांना देण्यात आल्या होत्या मात्र याही फोर जी ई पास मशीनचे सर्व्हर नियमित राहत नसल्याने रास्त दुकानदारांबरोबर शिधा धारकही कमालीचे त्रस्त झाले होते . त्यामुळे तालुक्यातील सर्व रास्त दुकानदारांनी या ई पास मशीन तहसीलदार यांच्याकडे दिं ५ ऑगष्ट २०२४ रोजी परत केल्या असून तालुक्यातील सर्व शिधारकांचे वाटप थांबले आहे. सध्या आता दोन दिवसांनी नागपंचमी सण आहे तसेच आता सणासुदीचे दिवस असल्याने जिल्हाधिकारी यांनी त्वरित स्वस्त धान्य दुकानातील ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, राजेंद्र तेलंगे, किशोर धामंदे,मोहन नरडवार ,किशोर हिवरकर, रवी देशमुख, प्रवीण येंबडवार, प्रकाश पोपट, योगेश देवतळे, मनु वासेकर, साहारे, आदी सरपंच यावेळी उपस्थित होते
