➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पुसद:- श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्व खर्चातून सर्व विध्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट गणवेश वाटप केले शालेय गणवेश हा वेगळा आहे तर शनिवारी पीटी आणि ऑफ दिवशी मुलांनी शाळेत परिधान करून यावा म्हणुन दिला आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना मुबलक कपडे नसतात म्हणून शालेय गणवेश ज्या दिवशी नसतो त्या दिवशी सुध्दा विद्यार्थ्यांची शालेय शिस्त यामुळे जोपासल्या जाते आणि शिक्षकांनी मनावर घेतलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे शाळा मुख्याध्यापक यांचे मत आहे.
शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना सादा गणवेश परिधान करतात तर शहरी मुल जास्त टापटीप राहतात असा समज समाजात आणि विद्यार्थ्यांत दिसतो म्हणुन काही अंशी राहणीमाना वरुन ग्रामीण विद्यार्थ्यांत न्यूनगंड निर्माण होतो असा भेद राहु नये ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना सुध्दा एखाद्या कॉन्व्हेन्ट प्रमाणे गणवेष असावा म्हणून ही संकल्पना समोर ठेऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाल चव्हाण सर यांनी हा उपक्रम राबविला, या उपक्रमात सर्व स्टाफचे सहकार्य सुध्दा लाभले आज प्रत्येक कर्मचारी शाळेसाठी खर्च करतो असे नाही तर ग्रामीण माणिकडोह केंद्रातील या शाळेने सर्व शाळा समोर सामाजिक बांधिलकीच एका उत्तम उदाहरण ठेवलं आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी खरी सामाजिक बांधिलकी जपली असे म्हणावे लागेल, शाळेकडून विद्यार्थ्याना मोफत स्पोर्ट गणवेश मिळाला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांत आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
