वडगाव ते मसोला गावाचा पांदण रस्ता व नाल्यावरील पूल तात्काळ बांधा – डॉ. अरविंद कुळमेथे, बिरसा ब्रिगेडचे कळंब तहसीलदारांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी तहसीलदार कळंब यांना बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात रस्ते दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले. कळंब तालुक्यातील वडगाव ते मसोला या गावातील पांदण रस्ता हा अत्यंत
दूरअवस्थेत आहेत. या रस्त्याने पूर्णतः चिखल झालेली असल्यामुळे व पाणी साचलेले राहत असल्यामुळे त्या रस्त्यातून ये-जा करणे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना कठीण झालेले आहे. तसेच या रस्त्यावर नाले असल्यामुळे नाल्यांना सुद्धा माणूस भर पाणी राहते. त्यामुळे त्या नाल्यातून ये-जा करता येत नाही. नाल्याच्या पलीकडे शेती आहेत त्यामुळे नाल्यातून ओल होत, चिखलातून जावं लागते, बैलगाड्या व जनावरांना सुद्धा त्या रस्त्यावरून जाता येत नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे कामे थांबलेले आहेत.
तरी हा नाहक त्रास आपण लक्षात घेता हा पांदण रस्ता व या रस्त्यावरील नाल्यांवर पूल हे तात्काळ बांधून देण्याची कारवाई करावी. अन्यथा नाईलाजाने सर्व गावकऱ्यांना आंदोलनास बसावे लागेल असा इशारा यावेळी डॉ.अरविंद कुळमेथे, उमेश येरमे, महादेवराव मेश्राम,नानाजी कनाके, अल्केश कन्नाके, ज्ञानेश्वर देवतळे, राजु देवतळे,किसना चांदेकर,किशोर कंगाले,चेतन अलोणे, आशिष पिंपळकर, शेषराव मडावी , गणेश दाते व आदी ग्रामस्थांनी यावेळी निवेदनातून तहसीलदार कळंब यांना दिला.