बिरसा ब्रिगेड मार्फत मेटीखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

बिरासा ब्रिगेड जनतेच्या हक्काची लढाई लढत असतांना जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे घेणे सुद्धा सुरू आहे.दिनांक १८ऑगस्ट रविवार ला मेटीखेडा येथे मोफत हाडांच्या आजारा संदर्भात वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन केले होते,अध्यक्ष स्थानी प्रा. वसंतराव कनाके असून उद्घघाटक बिरसा ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांनी रीतसर शिबिराचे उद्घाटन केले,त्याच प्रमाणे गावचे सरपंच गेडाम साहेब उपस्थित होते.शिबिरातील जनतेची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉक्टर म्हणून डॉ.आशिष चव्हान (एम. एस. ऑर्थो तज्ञ), डॉ.निलेश चव्हान ,(एम. एस.आर्थो तज्ञ) उपस्थित राहून जनतेच्या आरोग्याची पहाणी करून लागणारी दवाई रूग्णांना मोफत देण्यात आली.२०० रुग्णांची तपासणी झाली.आरोग्य शिबिराच्या सुरवातीला डॉक्टरांचे आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. रुग्णांना आरोग्य विषयी काळजी घेण्याचे व आजारांच्या इलाजासंदर्भात शासनाच्या असलेल्या सुविधांविषयी सुद्धा माहिती देण्यात आली.शिबिरात रुग्णांचे सेवेसाठी बीरसा ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश येरमे,जिल्हा मीडिया प्रमुख विनोद उईके,जिल्हा संपर्क प्रमुख सुरज मरस्कल्हें, अल्केश कनाके उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजना करीता बिरसा ब्रिगेड चे रोशन घोडाम,अभी ठाकरे,संकेत घोडाम, सुमित पुंने,तुषार घोडाम, धनराज आडे, रविकांत उईके,किशोर कोवे,योगेश तुमराम,कवीश्वर गेडाम,यांचे सहकार्य लाभले.