
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बिरसा ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी आपले गावा गावात जनतेच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहे, आज दिनांक १९ ऑगस्ट ला डोंगरखर्डा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.शिबिराचे उद्घघाटकीय भाषणात मार्गदर्शन करताना बीरसा ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष तथा शिबिराचे उद्घघाटक डॉ.अरविंद कुळमेथे म्हणाले,आजाराने पाय घुसून मरण्या पेक्षा तुमच्या आजाराच्या समस्या आम्हाला सांगा ,तुमच्या आरोग्य समस्यावर आम्ही उपचार करू.कोणालाही एक पैसा लागणार नाही,सर्व इलाज मोफत मध्ये केले जातील.कोणीही आपली बिमारी लपऊ नये.लपविल्याने ती वाढत जाते.आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यावर इलाज होणे आवश्यक आहे,तुम्ही आम्हाला सांगा वेळोवेळी मोफत मध्ये इलाज करू.गावा गावात आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना सांगा ते सुध्दा आम्हाला सांगून तुमचा इलाज करतील असे सांगितले.जनतेच्या आरोग्य तपासणीसाठी प्रमुख अतिथी डॉक्टर म्हणून डॉ. प्रवीण चव्हाण (ऑर्थो. तज्ञ),हजर होते.त्यांनी आणि डॉ. कुळमेथे सरांनी ३०० च्यावर पेशंट तपासून त्याचे आजार प्रमाणे मोफत मध्ये दवाई देण्यात आल्या.जनतेच्या सेवेसाठी बिरसा ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश येरमे, अल्केश कनाके सेवेत हजार होते.या शिबिराचे आयोजन बीरसा ब्रिगेड संघटनेचे संपर्क प्रमुख अजाबराव कोरांगे तसेच संघटनेचे पदाधिकारी गणेश घोडाम,विनोदराव पंचेबुध्दे,सुरेश वाढवे,रवी गेडाम, वामनराव देशमुख,सौ.प्रतिभा इवनाथे,अमोल गेडाम यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.शिबीर समाप्ती नंतर गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले.
