विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा संपन्न

‌‌

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने अभ्यांकर कन्या शाळा यवतमाळ येथे दिनांक 1/9/2024 रोज रविवारला दुपारी अकरा वाजता सहविचार सभा संपन्न झाली.या सभेत पार पडलेल्या जिल्हा अधिवेशनाच्या पावती पुस्तके व पैसा जमा करणे, जिल्हा कार्यकारिणी निवडणूक संदर्भातील माहिती यवतमाळ जिल्हा कार्यवाह यांच्या कडे देणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सोबत आढावा बैठक आयोजित करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या घेण्यासाठी चर्चा करणे, सोबतच अध्यक्ष यांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करणे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. सोबतच यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांच्या वाढदिवसाचा योगायोग आल्याने त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख सर हे होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, कार्याध्यक्ष आनंद मेश्राम सर मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण जिवतोडे सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कचरे सर यांनी यांनी केले तर आभार राहूल कोचे सर यांनी मानले.या बैठकीत प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर, यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद मेश्राम सर, विजय खरोडे सर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर,शाम बोडे सर, श्रीकांत अंदूरकर सर, जिल्हा सल्लागार मनोज जिरापुरे सर, जिल्हा सहकार्यवाह सौ.संध्या जिरापूरे मॅडम, यवतमाळ तालुका अध्यक्ष राहुल कोचे सर, कळंब तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर मुरखे सर, पांढरकवडा तालुका अध्यक्ष गजानन रासमगुडवार सर, पांढरकवडा तालुका कार्यवाह विलास वाघमारे सर,विमाशी सदस्य यवतमाळ जिल्हा लक्ष्मिकांत कचरे सर यांच्या सह अनेक आजिवन सदस्य उपस्थित होते.