
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या पिकाची लागवड केली याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई पीक पहाणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे . परंतु तालुक्यातील अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई पीक पहाणी केलेली नसून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पहाणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना ई पीक पहाणी करण्याकरिता केवळ दोन दिवस उरले आहे. हस्तलिखित माहितीवर बरेचदा अपडेट पणा राहत नाही त्यासाठी शासनाने ई पीक पहाणी नोंदणीचा आधार स्वीकारला आहे हायटेक जमान्यात शेतकऱ्यांना सुद्धा आपला सातबारा तांत्रिक घटकांचा अभ्यास करून स्मार्ट मोबाईलच्या आधाराने ई पीक पाहणी अंतर्गत अपडेट राहण्याचे ठरवले आहे.कृषी विभाग यासाठी जनजागृती करीत आहे.
ई पीक नोंदणी न केल्यास कोणकोणते होणार तोटे
कर्ज प्रकरण सादर करता येणार नाही, पिक विमा मिळणार नाही, नुकसान झाल्यास भरपाई चे पंचनामे होणार नाही, सातबारा निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही,खरेदी विक्रीसाठी अडचणी वाढतील,अनुदानासाठी अडचण निर्माण होईल, शासकीय आधारभूत कापूस तूर सोयाबीन खरेदी केंद्रावर आपला माल विकता येणार नाही, चालू वर्षाचा सातबारा निघणार नाही,आदी बाबीकरिता अडचण निर्माण होईल
नेटवर्क अभावी नोंदणीला विलंब
ई पिक पहाणी नोंदणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणीला समोर जावे लागत आहे प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने नोंदणी ही पराधीन झालेली आहे नोंदणी वेळी ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने सुद्धा नोंदणीला विलंब होत आहे
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
शासनाने नोंदणी करता पुढचे दहा दिवस पुन्हा वाढवून द्यावे तसेच शेतकऱ्यांना नोंदणी करिता मार्गदर्शनपर शिबीर अथवा शासकीय यंत्रणेमार्फत नोंदणी करिता सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
