न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महा मुख्यमंत्री निवडणूक संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महा मुख्यमंत्री निवडणूक घेऊन सत्र 2024 पंचवीस करता शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले यावेळी निवडणुकीत प्रत्यक्ष 52 विद्यार्थी उमेदवारांनी सहभाग घेतला तर 1670 विद्यार्थी मतदार म्हणून या निवडणुकीत सहभागी झाले होते. निवडणूक आयोग घेते त्याच पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला त्यामध्ये निवडणुकीची घोषणा करून आचारसंहिता लावण्यात आली. नंतर नामनिर्देशन पत्र दाखल करणे उमेदवारी अर्ज मागे घेणे उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करणे उमेदवारांना प्रचार व प्रसारासाठी वेळ देणे नंतर प्रत्यक्ष मतदान व त्याच दिवशी निवडणूक निकाल असा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन तसेच प्रार्थनेच्या वेळेस प्रचाराची संधी देण्यात आली होती निवडणूक आयोगाप्रमाणेच उमेदवार कक्ष बनवण्यात आले होते शाही लावण्यात आली होती तसेच शाळेचे ओळखपत्र व आधार कार्ड च्या माध्यमातून मतदारांची ओळख सुद्धा पठवण्यात आली होती प्रत्यक्ष मतदानासाठी दोन निवडणूक केंद्र बनवण्यात आले होते त्यामध्ये केंद्राध्यक्ष मतदान निवडणूक अधिकारी एक दोन तीन अशा नियुक्ती करण्यात आल्या होत्या मतदान कक्ष तसेच मतपेट्या सुद्धा निवडणूक आयोगासारख्याच बनवण्यात आल्या होत्या निवडणुकीमध्ये स्वयंसेवकाचे काम राष्ट्रीय छात्र सेना तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहिले मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह होता तसेच रांगा लावून विद्यार्थ्यांनी मतदानामध्ये भाग घेतला मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली मतमोजणीनंतर विजय उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच बँड वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले निवडून आलेल्या उमेदवारांमधून शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून हर्षल उगेमुगे उपमुख्यमंत्री राहुल कोवे प्रेरणा झाडे क्रीडामंत्री क्रिश किनाके राज्यमंत्री तन्मय हिवरकर स्वच्छता व आरोग्य मंत्री प्रतीक दारवेकर राज्यमंत्री गोकुळ चौधरी वृक्ष संवर्धन व पर्यावरण मंत्री गौरी माळवे राज्यमंत्री प्राची शिवणकर परिपाठ व शिस्त मंत्री युवराज नागोसे राज्यमंत्री जयवंत ढाले शालेय पोषण आहार मंत्री अनुश्री ताम गाडगे राज्यमंत्री उन्नती आत्राम सांस्कृतिक मंत्री ओम काकडे राज्यमंत्री प्रद्युम कन्नाके या सर्व मंत्र्यांना एका कार्यक्रमांमध्ये मंत्रिपदाची शपथ देण्यात आली ही महा मुख्यमंत्री निवडणूक संस्थेचे अध्यक्ष बी के धर्मे सचिव डॉक्टर अर्चना धर्मे प्राचार्य विजय कचरे उपप्राचार्य सुरेश कोवे पर्यवेक्षक सुचित बेहरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश काळे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण कामनापुरे यांनी काम पाहिले एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच शाळेमध्ये निवडणूक घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व निवडणुकीचे कामकाज जवळून अनुभवले