
समुद्रपुर : परडा येथे शेतात काम करीत असताना विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका महिलेचा मृत्यू झाला. तर या दुर्दैवी घटनेत या महिलेच्या पतीलाही विजेचा धक्का लागून दुखापत झाली आहे.
ज्योतीताई महाजन असे या मृत महिलेचे नाव आहे. तर दिलीप महाजन असे त्यांच्या पतीचे नाव आहे. महाजन दाम्पत्याला एक दोन वर्षाचा व दुसरा चार वर्षाचा, अशी दोन मुले आहेत. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिलीप महाजन यांच्या घरी भेट देत महाजन कुटुंबीयांचे सांत्वन केले व शासनाला तात्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली.
घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देत याप्रकरणी जातीने लक्ष घालून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांच्यासह शहराध्यक्ष बालू वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, श्रीकांत भगत, सोनू बुरीले, विष्णू कारमोरे, रितेश चंदनखेडे उपस्थीत होते.
