कामगारांच्या उपोषणाच्या समर्थनात बाभुळगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर धडक

कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या – डॉ.अरविंद कुळमेथे

मागील पाच दिवसापासून कामगार संघटनेचे सत्यपाल डोफे यांचे नेतृत्वात सुरू असलेल्या कामगार संघटनेच्या आमरण उपोषणा समर्थनात आज दिनांक २३सप्टेंबर सोमवार रोजी बाभुळगाव येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालया वर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात कामगारांनी धडक दिली.
यावेळी कामगारांच्या अर्जावर ग्रामसेवक सह्या करत नसल्यामुळे तात्काळ त्या अर्जांवर सह्या देऊन त्यांचे अर्ज स्वीकारण्यात यावे, कामगारांना डिनर सेट देण्यात यावा, कामगारांना काम करण्यासाठी मिळत असलेल्या कामाची किट पेटी देण्यात यावी, लाभार्थी कामगारांना ज्या शासनाच्या योजना आहे त्या तात्काळ देण्यात याव्या, अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यामध्ये दलालांकडून १०००-२००० रुपये कामगारांकडून वसुली चालू आहे ते दलाल बंद करण्यात यावे. व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. व भ्रष्टाचार करत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यासाठी घोषणा देत भव्य मोर्चा काढण्यात आला, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी बिरसा ब्रिगेडचे डॉ.अरविंद कुळमेथे,किशोर मेश्राम, सचिन मालखेडे ,अल्केश कनाके, कामगार संघटनेचे वंदना शेळके, सम्येक मम्हैस्कर, संजय शेळके, सुजाता डोफे यांचे सह आदी कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.