अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात धर्मापुर घाटावरून अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने कडक कारवाई केली आहे. दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:00 वाजता मंडळ अधिकारी एम. डी. सानप आणि तलाठी एम. जे. देवळे यांनी ट्रॅक्टर क्रमांक MH 29 BV 8775 वर कारवाई केली. हा ट्रॅक्टर अवैधपणे रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले.नियमित रेती तस्करी या घाटावरून राजरोस पणे होताना दिसून येत आहे,तालुक्यात कोणत्याही घाटाची लिलाव झाला नसून चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करून दामदुपत्त भावाने विकल्या जात आहे.या घटनेमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः धर्मापूर, ता. राळेगाव येथील घाटातून रेतीचा सातत्याने अवैध उपसा होत असल्याची तक्रार होती. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी जनतेतून होताना दिसून येत आहे, या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर अंकुश लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महसूल विभागाच्या या कठोर कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे कि एकाड्याच वाहनावर कारवाई करून थांबणार याची सुधा चर्चा सुरू आहे,अशीच कारवाई व्हावी अशी मागणी होताना दिसून येते आहे.