सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान शिरकाव करत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा वेळ व श्रम वाचत आहेत असाच एक प्रयोग तालुक्यात सध्या शेतकरी करीत आहेत तालुक्यातील शेतकरी कपाशी तसेच सोयाबीन पिकावर फवारणीसाठी ड्रोन चा वापर करीत आहेत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला फवारणीसाठी सध्या ड्रोन धावून आला आहेत ज्यामुळे फवारणी संबंधी अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या सुटल्या आहेत .सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हे खूप वाढले तसेच पिकात चिखल असतो पीक खूप वाढल्यामुळे सोयाबीन मध्ये फवारणीसाठी शेतमजूर तयार होत नाही कारण सोयाबीनच्या पिकामध्ये खाली काही दिसत नसल्याने तसेच सापासह इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असल्याने शेतमजूर सोयाबीन वरती फवारा मारण्यास धजत नाही अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला ड्रोन धावून आला आहेत ड्रोन च्या मदतीने शेतकरी सोयाबीनमध्ये तन नाशकाची तसेच कीटकनाशकाचे फवारणी करत आहेत ड्रोनला 12 लिटर ची टाकी आहे त्या टाकीमध्ये एका वेळेस एक एकराचे औषध टाकायचे दहा मिनिटांमध्ये ड्रोन एक एकर फवारून मोकळा करतो सोयाबीन मध्ये तण नाशकाची फवारणी करत असताना सोयाबीन हे माडी असावे लागते सोयाबीन पिकामध्ये जर तुरी असेल तर तन नाशक ड्रोनने फवारणी करता येत नाही सोयाबीन वर कीटकनाशकाच्या फवारणीसाठी सोयाबीनमध्ये तुरी असल्या तरी अडचण येत नाही ड्रोन मुळे दहा मिनिटांमध्ये एक एकर फवारले जात आहे यामध्ये वेळेची बचत होते फवारा चांगला होतो याशिवाय सध्या एक एकरासाठी ड्रोन चालक पाचशे रुपये घेतात काही ड्रोन चालक हे तीनशे रुपये सुद्धा घेऊन एक एकर मारून द्यावयास तयार आहेत म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक बचत सुद्धा होते कारण फवारणीसाठी शेतकऱ्याला फवारणी करणारा व पाणी आणणारा असे दोन मजूर लागतात फवारणीचा शेतमजुराचा चारशे रुपये रोज सध्या चालू आहेत ड्रोन ने मात्र मजुरीच्या खर्चातही बचत होते सोयाबीन प्रमाणेच कपाशी पिकावर ही शेतकरी फवारणीसाठी ड्रोन चा वापर करत आहे ज्या कपाशीच्या शेतामध्ये तन खूप वाढले आहेत अशा शेतामध्ये तन नाशक फवारणीसाठी ड्रोन हा उत्तम पर्याय आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वच पिकात तणाचे साम्राज्य मोठे होते ज्या ठिकाणी सामान्य शेतमजूर तन नाशक फवारण्यास तयार होत नव्हते अशा तनामध्ये ड्रोन दारे फवारणी करून शेतकरी तणाचे व्यवस्थापन करीत आहेत याशिवाय कपाशी पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना ड्रोन उपयोगी पडत आहेत अतिवृष्टीमुळे यावर्षी शहरांमध्ये जवळपास हजार एकर जमीन पडीत आहेत या शेतकऱ्यांच्या मदतीला सुद्धा ड्रोन धावून आला आहे या शेतात सध्या तणाचे साम्राज्य आहेत माणूसभर तन झाले आहेत अशा तणाचे व्यवस्थापनही ड्रोन द्वारे शेतकरी करीत आहेत दिवसेंदिवस शेतमजुरीचे वाढत असलेले दर शेतमजुरांची करावी लागणारी हाजी हाजी व वेळेची बचत यावरती भविष्यात निश्चितच ड्रोन हा चांगला पर्याय आहे शासनाने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात सबसिडी वरती ड्रोन उपलब्ध करून दिल्यास ड्रोन हा निश्चितच शेतकऱ्यांना भविष्यात वरदान ठरू शकतो