
सहसंपादक: रामभाऊ भोयर
.
राळेगाव येथील गोर -गरिबांनची कायम मदत करणारे भाजपा शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांचा झाडगाव राळेगाव मार्गांवर अपघात झाला. भाजपा उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या प्रचारासाठी झाडगाव येथून येत असताना हा अपघात झाला. गाडी मध्ये तीन जण असल्याची माहिती आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नागपुर येथे हलवण्यात आले.
डॉ. कुणाल भोयर हे राळेगाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय वर्तुळातील एक प्रसिद्ध नाव आहे , त्यांचे वडील देखील तालुक्यातील कोणत्याही गोर -गरिबांना कोणतीही अपेक्षा न करता वैद्यकीय मदत देत होते. त्यांच्या मृत्यू नंतर हा वारसा डॉ. कुणाल भोयर यांनी चालवला. त्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच राळेगाव तालुक्यात चिंतेचे मळभ दाटून आले . प्रा. डॉ. अशोक उईके यांनी लगेच सर्व यंत्रणा कामी लावून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. निवडणुक महत्वाची असेलही मात्र डॉ.कुणाल भोयर हा माझा हक्काचा कार्यकर्ताच नाही लहान भाऊ आहे . त्या साठी थोडं अधिक प्रचाराच नियोजन कमी -अधिक होईल मात्र त्यांच्या साठी सर्व प्रयत्न करणार आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचार सुरु आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
डॉ. कुणाल भोयर यांच्या अपघाताने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रचारा दरम्यान झालेल्या या अपघाताने समाजमन चिंतेत असलेले दिसते
