कंटेंनरच्या विचित्र अपघात वेडसर व्यक्तीचा मृत्यू,कंटेनर चालक घटनास्थळातून फरार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एका भरधाव कंटेंनर ट्रकने एका वेडसर व्यक्तीला जोरदार धडक दिली,यात वेडसर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
ही अपघाताची घटना दि २८ नोव्हेंबर च्या पहाटे अंदाजे ४.३० च्या दरम्यान वडकी येथील सैनिक पब्लिक शाळेसमोर घडली.त्यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या त्या वेडसर व्यक्तीचे नाव गाव माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर वेडसर व्यक्ती हा पहाटे नॅशनल हायवे महामार्गावरून पायदळी जात होता याच दरम्यान नागपूर कडून येणाऱ्या आर जे ०९ जी बी ०७३० क्रमांकाच्या कंटेनर चालकाने पायी जात असलेल्या वेडसर व्यक्तीला सैनिक शाळेसमोर जोराची धडक दिली यात त्याचा मृत्यू झाला.
वडकी पोलिसांनी वेडसर व्यक्तीचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता राळेगाव येथे पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय प्रशांत जाधव व बिट जमादार संदीप मडावी हे करीत.