
पो. स्टे. वडकी हद्दीतील सिंगलदीप शिवारात असलेल्या नामदेव धोंडू वडदे यांचे शेत बांधावर वाघाने दोन बैलांचा केला खत्मा,तर एका गाईला आणि एका गोऱ्याला केले जखमी. सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे हे तातडीने घटनास्थळी पोहचुन सदर घटनेची माहिती वनविभागाला (फॉरेस्ट ) यांना देण्यात आली फाॅरेस्ट चे वनरक्षक आरती भोसरकार आणि वनपाल मोहन टोंगे तातडीने घटनास्थळी पोहचुन वनविभागाने पण सदर घटनेचा पंचनामा केला .व सदर घटनास्थळी जमलेल्या लोकांना झालेल्या हानीचे फॉरेस्ट कडून नुकसान भरपाई भेटणार असल्याचे सांगून सर्वांना गावात आणले आहे. व फॉरेस्ट कडून सांगितल्याप्रमाणे वाघाने बैलाची शिकार केली त्या ठिकाणी उद्या कोणीही जाऊ नये याबाबत गावात दवंडी दिली आहे. घटनास्थळ परिसरात कॅमेरे बसवून पुढील कारवाही फॉरेस्ट विभाग करीत आहे.
