अमरावती शिक्षण उपसंचालक पदी सौ. निलिमा टाके ( गुल्हाणे ) मॅडम रुजू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अमरावती शिक्षण उपसंचालक पदी डॉ.शिवलिंग पटवे हे कार्यरत होते.तर त्यांची नुकताच नागपुर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सौ. निलिमा टाके गुल्हाणे ह्या अमरावती शिक्षण उपसंचालक पदी रूजू झाल्या असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख सर अमरावती जिल्हा महानगर अध्यक्ष अतुल देशमुख अमरावती जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अमरावती जिल्हा महानगर कार्यवाह अरविंद चौधरी अमरावती जिल्हा कार्यवाह ग्रामीण आशिष इंगळे जिल्हा उपाध्यक्ष अमोल माकोडे, राजेंद्र कांबळे यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.