
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील तांड्यावर बसविले ट्रान्सफॉर्मर हे 63 के.व्ही.चे असून या दोन तीन महिन्यांत दोन तीन वेळा हे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने दोन तीन वेळा दुरूस्त करून बसवावे लागले परंतु त्या ट्रान्सफॉर्मरवर पंपाचा भार कपॅसिटी पेक्षा जास्त असल्याने ट्रान्सफॉर्मर टिकत नव्हता.अशा प्रकारे होणारा त्रास असह्य झाल्याने वरूड जहांगीर येथील शेतकरी श्रावनसिंग वडते यांनी दिनांक 7/12/2024 रोजी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून बातम्या प्रसारित करून ही बाब विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली.दुसऱ्या दिवशी अनेक वृत्तपत्रांतून बातमी प्रसिद्ध झाल्याने विद्युत कंपनीने या बातम्यांची दखल घेत आणि शेतकऱ्यांच्या गरज लक्षात घेऊन दिनांक 9/12/2024 रोज सोमवारला दुपारी दोन वाजता 63के.व्ही.चे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून होणाऱ्या रब्बी पिकांच्या नुकसानापासून वाचविले. अशाच प्रकारे अन्यायाविरुद्ध बातम्या प्रसारित करत असल्याने सर्व सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळवून देणाऱ्या वृत्तपत्राचे आणि विद्युत वितरण कंपनीचे शेतकरी श्रावनसिंग वडते यांनी गावातील शेतकऱ्यातर्फे आभार मानले आहे.
