येत्या 19 डिसेंबरला नागपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ धरणे आंदोलन करणार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 19/12/2024 रोज गुरूवारला सकाळी ठीक 12 ते 4 वाजेपर्यंत खालील मागण्या घेऊन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवन परिसरात यशवंत स्टेडियम जवळ धरणे आंदोलन / निदर्शने करण्यात येणार असून 1) राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.2) विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान देण्यात यावे.3) राज्यातील अघोषित शाळा व वाढीव नैसर्गिक तुकड्या अनुदानास पात्र घोषित करून निधीची तरतूद करण्यात यावी.4) न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर विभागातील आदिवासी /नक्षलग्रस्त क्षेत्रातील काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एक स्तर वेतनश्रेणी योजनेचा लाभ पूर्ववत सुरू करण्यात यावा. अशाप्रकारच्या अनेक मागण्या घेऊन येत्या 19 तारखेला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर यांच्या नेतृत्वाखाली धरणे देण्यात येणार असून या धरणे आंदोलनाला माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे सर, प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख सर, प्रांतिक उपाध्यक्ष रमेश काकडे सर, जयप्रकाश धोटे सर, जयकुमार सोनखासकर सर, विजय ठोकळ सर, विभागिय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले सर, बाळासाहेब गोटे सर, कोषाध्यक्ष भुषण तल्हार सर, इत्यादी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यावेळी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार असून या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन, कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे तथा समस्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.