स्वामी समर्थ नामात दुमदुमले ढाणकी शहर


प्रति::प्रवीण जोशी
ढाणकी.


१७ डिसेंबर २०२३ रोजी ढाणकी शहरात साप्ताहिक श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र चालू करण्यात आले. १६ डिसेंबर २०२४ श्री दत्त जयंती व १७ डिसेंबर २०२४ श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र वर्धापन दिनाचे औचित्य निमित्याने केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दत्त जयंती सप्ताह निमित्ताने ७ दिवस त्रिकाल आरती करण्यात येत होती. विविध स्तोत्र मंत्र, पारायण असे विविध भक्तीयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२::३९ वा श्री गुरुचरित्र ४ था अध्याय वाचन करून शास्त्रोक्त पद्धतीने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सत्यदत्त पूजन व दि.१७ डिसेंबर रोजी केंद्राचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. पालखी सोहळा मध्ये शहरातील विविध स्थरावरून सेवेकर्‍यांचा उस्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. श्री स्वामी समर्थांचे व दत्त नामात मुख्य मार्गावरून मार्गाने पालखी निघाली सहभागी झालेल्या सेवेकर्‍यांनी एकाच रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अध्यात्माचे महत्व केंद्र निरीक्षक पूनमताई चव्हाण, केंद्र प्रमुख प्रशांत पंडितकर भक्तांना सांगत होते. व प्रपंच सांभाळत परमार्थ साधण्याचे आवाहन केंद्र निरीक्षकांनी केले