
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, अप्पर आयुक्त अमरावती अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.26 ते 28 डिसें. 2024 दरम्यान क्रीडा संकुल राळेगाव येथे या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल.26 तारखेला स. 10:30 वा उदघाट्न समारंभ तर 28 डिसें. दु. 4 वा बक्षीस वितरण व समारोप समारंभ होणार आहे.
क्रीडा स्पर्धा 2024 – 25 च्या उदघाट्न सोहळ्याला उदघाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ना. मृद व जल संसाधन मंत्री संजय राठोड उपस्थित असतील. विशेष अतिथी म्हणून राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख,चंद्रपूर च्या खासदार प्रतिभा धानोरकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आस्टीकर, विधान परिषद सदस्या भावना गवळी,विधान परिषद सदस्य किरण सरनाईक,धीरज लिंगाडे,आमदार राजू तोडसाम,आ. बाळासाहेब मांगूळकर,आ.संजय देरकर,आ. किसन वानखडे,आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे,जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मु. कार्य. अधिकारी मंदार पत्की,पो. अ. कुमार चिंता, प्रकल्प अधिकारी मेघना कावला,सह. जिल्हाधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर,उप. विभागीय अधि. विशाल खत्री,उपायुक्त जागृती कुमरे,सहा. आयुक्त एस. आर. पेडेकर,चंद्रकांत खारोळे,ममता विंधळे,प्रकल्प अधिकारी मोहन व्यवहारे,एस. आर. बारसे,चेतना मोरे,अमोल मेतकर,जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड आदी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. मैदान समितीची जैय्यत तयारी राळेगांव क्रिडा संकुल येथे होणाऱ्या विभागीय क्रिडा स्पर्धेची मैदान समिती च्या वतीने तयारी सुरु आहे
