वनोजा गावकरी,प्रशासन यांच्या प्रयत्नानी खेळ व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

     

राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अंत्यत यशस्वीरीत्या संपन्न झाल्या या करीता सम्पूर्ण वनोजा गावकरी, ग्राम पंचायत व तालुका प्रशासन, शिक्षण विभाग, ग्राम शिक्षण समिती, शिक्षकवृंद यांचे योगदान मोठे होते.असे प्रतिपादन आयोजन समिती च्या वतीने चंदू उगेमुगे यांनी केले. विशेष म्हणजे या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे आदिवासी मंत्री ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. मंत्री झाल्यानंतर राळेगाव तालुक्यात सर्वात पहिले प्राधान्य त्यांनी या कार्यक्रमाला दिले.
दी. 4 ते 6 जाने. दरम्यान वनोजा येथे या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.दी. 6 जाने. ला या कार्यक्रमाचा समारोप झाला. 7 जाने. ला कब -बुलबुल मेळावा पार पडला. उदघाट्नीय मनोगत व्यक्त करतांना ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी सर्वांनी अंत्यत चांगले नियोजन केल्याचा आवर्जून उल्लेख करून, या यशस्वी आयोजना व उल्लेखनीय कार्या बाबत शिक्षक -शिक्षिकांचा सन्मान देखील केला.
चंदू उगेमुगे यांनी प्रशासनाने अंत्यत चांगले नियोजन केले. स्पर्धेत सहभागी चिमुकल्यांच्या जेवणाची,पिण्याच्या पाण्याची, स्वछता व इतर बाबींची व्यवस्था चांगली झाल्या बाबत समाधान व्यक्त केले. तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, गट शिक्षणाधिकारी राजू काकडे, वि. अ.नवनाथ लहाने, निलेश दाभाडे यांचे सह अनेकांनी या करीता सहकार्य केले अशी भावना व्यक्त केली.
वनोजा गावाला हा सन्मान मिळाल्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. ग्राम पंचायत, वनोजा शाळा व्यवस्थापण समिती यांचे सह सरपंच मालुताई कोटनाके, उपसरपंच प्रभाकर दांडेकर, ग्रा. प. सदस्य चंद्रशेखर उगेमुगे चंदाताई पोटुरकर, शालिनी तायवाडे, संजय आत्राम, सुनीता खुडसंगे व सर्वांनी मोठे योगदान दिले अशी भावना व्यक्त केली.