
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुभाष चंद्र बोस यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले होते त्यांनी आपल्या केलेल्या अभूतपूर्व कार्यामुळे ते भारतीयांच्या मनात सतत राहतील त्यांच्या योजनाबद्ध स्वातंत्र्य लढ्यातील हालचाली इंग्रज अधिकारी बारकाईने टिपत असले तरी सर्वांचे लक्ष विचलित करून त्यांनी स्वातंत्र्याचे कार्य पूर्ण केले…… देश गुलामगिरीत असताना त्यांनी जीवाची पर्वा न करता धाडसी निर्णय घेऊन इंग्रज सरकारच्या धोरणाला ठोस उत्तर दिले त्यामुळे सुभाष चंद्र बोस हे स्वातंत्र्यसंग्रामातील खरे हिरो होय त्यांच्या स्वातंत्र्य काळातील अनेक घटनांचे हुबेहूब चित्रण आपल्या व्याख्यानातून मेहकर येथील प्रा वसंत गिरी यांनी मांडले राळेगाव येथे स्वामी विवेकानंद विचार मंच द्वारा आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते…. त्यांनी वीर करुण रसात प्रसंग सांगून उपस्थित मंत्रमुग्ध झाले …………. श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित राळेगाव येथे ते बोलत होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार अमित भोईटे हे होते त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी उपनगराध्यक्ष जानराव गिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत धुमाळ औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष विनय मुनोत स्वामी विवेकानंद विचार मंच उपाध्यक्ष दिपाली बोकीलवर यांची उपस्थिती होती स्वामी विवेकानंद विचार मंच चे अध्यक्ष मोहन देशमुख यांनी प्रास्ताविक केले त्या कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम मेडूलकर आभार प्रदर्शन सविता पोटदुखे यांनी केले
