राळेगाव प्र धानमंत्री आवास शहरी घरकुलासाठी लाभार्थी कुटुंबांचा टाहो
चार दिवसात सर्व पात्र लाभार्थी कुटुंबांच्या घराच्या मोजणी व नगरपंचायत कडून घरकुलाचा
विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार नगरपंचायतने शहरातील सरकारी जागेवर राहणाऱ्या कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी 2017 -18 मध्ये प्रकल्प दोन व प्रकल्प तीन राबविण्यात येत आहे प्रशासनाची उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या अनस्तेमुळे पाच वर्षात एकही घरकुल महाराष्ट्र शासनाकडून नगरपंचायत कडून एकही घरकुल बांधून देण्यात आले नाही याच बाबीचा निषेध म्हणून शंकर गायधने यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करण्यात आले महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती शेकडोच्या संख्येने या आंदोलनाला महिला पुरुष लाभार्थी कुटुंबे उपस्थित राहिली या आंदोलनाला मुख्य अधिकारी गिरीश पारकर व भूमी अभिलेख चे अधिकारी भारत गवळी हे उपस्थित राहिले आंदोलकासोबत घरकुलावर चर्चा करण्यात आली आंदोलन घरकुल मुद्द्यावर आक्रमक होते आंदोलन व अधिकारी यामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सर्व लाभार्थी कुटुंबाच्या घरांची मोजणी सर्वेक्षण चारच दिवसात करून देण्याच्या भूमी अभिलेख अधिकारी भारत गवई यांच्या लेखी आश्वासनानंतर व मुख्य अधिकारी यांच्याकडून घरकुल प्राधान्याने विषय मार्गी लावण्याच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले नगराध्यक्ष रवी शेरम नगरसेवक दिलीप दूध गिरकर इत्यादीं उपस्थित होते या आंदोलनात भानुदास महाजन प्रकाश कळमकर प्रभाकर धोटे पार्वता मुखरे सुधाकर शिखरे पांडुरंग बोभाटे वनिता जुनगरे दीपा संजय कांबळे रवींद्र मेश्राम वेणू मेश्राम सुरेखा आत्राम सुनील शिरसागर महादेव मुखरे विजय सिंग ठाकूर नंदा चव्हाण प्रभाकर अनिल नगराळे दुर्गा वसंत कोदाने महादेव लांबाडे रामभाऊ मरस कोल्हे योगेश म लोंढे सहसेकडो लाभार्थी महिला व कुटुंबांनी सहभाग घेतला