
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी गावातील कवी निलेश दिगांबर तुरके यांनी राजधानी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नावर कविता सादर करून आपला ठसा उमटवलेला आहे, २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या दिल्लीतील तालकटोरा या स्टेडियमवर संमेलन घेण्यात आले. शेतकर्याच्या मुलांना आज लग्नासाठी मुली मिळत नाही हा ज्वलंत विषय त्यांनी आपल्या कवितेतून मांडला, “शेतकर्याची झाली बघा दैना.. लग्नासाठी पोरी कुणी देईना.” या आशयाची कविता सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सयाजीराव गायकवाड या सभामंडपात हे सादरीकरण झाले असून लोकांनी ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली, वास्तवदर्शी चित्रण कवी निलेश तुरके यांनी कवितेत केले होते.
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डाॅ ताराबाई भवाळकर होत्या. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार साहेब होते तर या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेबांनी केले,कवी निलेश तुरके यांच्या या यशाबद्दल कवी, साहित्यिक, आप्त मित्रमंडळ यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. कवी निलेश तुरके यांनी या संमेलनात यवतमाळ जिल्ह्याचे नाव मोठे करून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
