
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दहेगाव रेल्वे येथील
श्री रोशन गाठे ब. क्र. 826 होमगार्ड सैनिक रा दहेगाव रेल्वे येथून वर्धा अनाज मार्केट मधी शेतातील माल विकण्या करीता जात असता महिला आश्रम परिसरातील ब्रेकर वरून गाडी उडून गाडीवरील नियंत्रण सुटून डीव्हायडर वर जावून आदळला यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नाकातून तसेच कानातून रक्त प्रवाह दिसून येताच सेवाग्राम पोलिसांना घटनेची माहिती दिली असता सेवाग्राम पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा के केला ही घटना शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असून गाठे याला परिसरातील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता सेवाग्राम रुग्णालय इथे उपचारा करीता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गाठे परिवारासह मित्र परिवारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
शनिवारी रोज 12 वाजता त्याच्या पाथिर्वावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
त्याच्या पाठीमागे वय्यस्क वडील पत्नी व एक 4 वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे.
रोशन यांनी सन 2012 साली होमगार्ड संघटनेत दाखल झाला सर्वांशी मन मिळवू व शांत स्वभावाचा असल्याने मित्र परिवारामध्ये आपल्या कुतूहलाची छाप गावासह परिसरात सोडली असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे होमगार्ड संघटनेच्या निष्काम सेवा या ब्रीद वाक्याने सर्व होमगार्ड वर उपासमारीची वेळ येत आहे रोशन गाठे यांच्या कडे उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधनं नसल्याने मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा कसाबसा उदरनिर्वाह करीत होता या करीता शासनास आता पर्यंत हजारोच्या वर निवेदने देण्यात आली असून यात सैनिकांना नियमित काम जुन्या पेन्शन योजनेत सामील करून घेणे तसेच सैनिक मरण पावल्यास अथवा अपघात झाल्यास त्याच्या परिवाराच्या उदरनिर्वाह करिता शासनाकडून भरघोस निधी मिळावा ज्यामुळे परिवारावर उपासमारीची वेळ न येता सन्मानाने जगता येईल अश्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने होमगार्ड सैनिक आर्थिक विवंचनेत झुजत आहे रोशन गाठे याने 28 तारखे पर्यंत परीक्षेचा पहिला बंदोबस्त पार असून
आता बंदोबस्तावर नसल्याने शासन त्याच्या कुटुंबीयांना मदत करणार की परत भीक मागून जगण्यास भाग पाडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
