
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पावन पुण्यतिथी उत्सवा निमित्य स्वर्गीय सौ चंदाताई बबनराव राडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ भव्य मोतीबिंदु नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक १६ मार्च २०२५ रोज रविवारला ११ वाजता स्थळ तुकडोजी महाराज मंदीर झाडगाव येते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर मुडे गुरूदेव प्रचारक तर प्रमुख पाहुणे कस्तुरबा हाॅस्पीटल सेवाग्राम येथील सुप्रसिध्द नेत्र तज्ञ डॉक्टर शुक्ला साहेब व कार्डीकर साहेब शंकराव तोडासे सरपंच बाबाराव किन्नाके संदिप राडे भरत पाल उल्हास देशपांडे उपसरपंच रोशन कोल्हे वासुदेव तिजारे रूपेश रेंघे यांच्या हस्ते फोटोचे पुजन करून कार्यक्रमाला सूरूवात करण्यात आली होती त्यावेळेस कार्डीकर साहेब यांनी डोळे आजार या बाबत माहीती दिली तसेच शंकराव तोडासे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मुडे साहेब यांनी आपले विचार मांडले त्यावेळेस डॉ शुक्ला साहेब यांच्ये मार्फत नेत्र तपासणीला सुरूवात करून ३२३ नेत्र रूग्णाची तपासणी करून मोतीबिंदु नेत्र शस्त्रक्रिया करण्या करीता ७२ रूग्णाची निवड करण्यात आली असुन त्यांना सेवाग्राम कस्तुरबा हाॅस्पीटल मध्ये ऑपरेशन करीता नेण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रकाश सोरते यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सचिन राडे यांनी केले तर आभार रूपेश रेंघे यांनी मानले तर शिबीर यशस्वीते करीता नारायण कुटे हेमंत चौधरी दिवाकर पानसे गणेश तिवसे देविदास जुनघरे चंदु काळे प्रताप खडसकार या सह अनेकांनी सहकार्य केले
