
यासहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिसांच्या नाकावर
टिच्चून अज्ञात चोरट्यांनी शहरात मुक्तसंचार करीत चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील चार वेगवेगळ्या दुकानांना लक्ष्य करीत चोरट्यांनी हजारो रुपयांच्या मुद्देमालासह इतर माल चोरून नेला. ह्या चोरीच्या घटना काल मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री दरम्यान घडल्या. या घटनेमुळे राळेगावमधील व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह न उभे राहिले आहे.
फिर्यादी राजू चंद्रभानजी पुडके (वय ५५ वर्षे, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे ग्रामीण रुग्णालयाजवळ ‘साहील डेली निड्स’ नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी (दि. २६) ते दुकान उघडायला गेले असता, त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा उघडलेला दिसला. त्यांनी
त्वरित आपला मुलगा साहील याला बोलावून पाहणी केली असता, दुकानातील ३ हजार रुपये किमतीचा कॅमेरा आणि गल्ल्यातील २२ हजार रुपये गायब होते.त्यानंतर, राजू पुडके यांच्या शेजारी दुकान चालवणारे चेतन किशोर कापसे
(वय २१ वर्षे, रा. शिवाजीनगर) यांनी सांगितले की, त्यांच्याही दुकानाचे पत्रे उचकटून ५ हजार रुपयांचा कॅमेरा आणि ६ हजार रुपये रोख चोरीला गेली आहे. यानंतर अविनाश जिवनराव मडावी (वय ३० वर्षे, रा. इंदिरानगर) यांनी
त्यांच्या दुकानातून ३ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे सांगितले. तर, नितीन शालिकराव दुणे (वय ३९ वर्षे, रा. इंदिरानगर) यांनी त्यांच्या दुकानातून २ हजार रुपये रोख आणि ८ हजार रुपये किमतीच्या अगरबत्तीच्या बॉक्सची चोरी झाल्याची माहिती दिली. अशाप्रकारे,
एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी राजू पुडके यांच्यासह चेतन कापसे, अविनाश मडावी आणि नितीन दुणे यांच्या मालकीच्या दुकानांना लक्ष्य करत एकूण ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर फिर्यादी राजू पुडके यांनी राळेगाव पोलीसात तक्रार दिली.
पान ठेलेही फोडले
या चोरीत साहिल पुडके यांच्या दुकानातून २२,००० रोख रक्कम तर इतर पानठेलेवाल्यांची चिल्लर नाणी, सिगारेट पाकिटे, तंबाखू, सुपारी व अन्य वस्तूंसह सुमारे ७०,००० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला
गस्त फसली ? – पोलिसांवर प्रश्नचिन्ह –
या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नियमित गस्त असूनही शहरात अशा घटना कशा घडतात, असा सवाल स्थानिक व्यापारी उपस्थित करत आहेत. पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच चोरटे धुडगूस घालतात का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांना चोरटे पकडण्याचे आव्हाण
राळेगाव पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गस्त अधिक मजबूत करावी, सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
