
संग्रहित फोटो
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
इंग्रजी व सीबीएससी पॅटर्न राबवत असलेल्या शाळा मागील काही दिवसात लग्न प्रसंगाच्या तारखा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पैसे भरा मोटारगाडी कुठेही घेऊन जा अशा योजनाबद्ध पद्धतीने गाड्या भाड्याने देण्याचे प्रयोजन आयोजिले असताना यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. असाच गैरप्रकार सध्या घडताना दिसतो आहे. “भीती कुणाची कशाला” असं म्हणत हे गाड्या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत पण यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अंध मूकी आणि बहिरी झाली की काय असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. तसेच आतापर्यंत अनेक अपघात मोटर गाड्यांचे झालेले आहेत पण थोडीफारही कारवाई करताना उपप्रादेशिक परिवहन विभाग दिसत नाही कारवाई झाल्यास त्यांना बक्षीस द्यायलाही हरकत नाही पण प्रथम तर कारवाईच होत नाही हे विशेष.
सर्व सामान्यांनी सुद्धा जागृत सजग व्हायला पाहिजे लग्न समारंभात भाड्याने ही मोटारसेवा वापरायला नाही पाहिजे कारण यांना स्कूल बस परवाना असतो. हजारो जनतेची सेवा करून व्यवसाय मांडून पैसे कमावण्याचा परवाना नसतो हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. भविष्यात अनवधानाने अपघात झाल्यास कसल्याही प्रकारचा मुआवजा मिळणार नाही.उलट रक्षण करणारे कायदेच तुमच्यावर चुकीचे पाऊल टाकले म्हणून गुन्हा दाखल करू शकते. या मोटारगाड्यांचा वापर शाळे व्यतिरिक्त कुठे होत असल्यास पालकांनी मुख्य अध्यापकासह संस्था चालकाला गप्प न राहता जाब विचारायला पाहिजे. अशा विविध प्रसंगाला ही वाहने जातात परिणामी रबरयुक्त टायरसह लायनर क्लचप्लेट इंजिनचे काम निघण्यास सुरवात होते. याचा परिणाम म्हणजे फी वाढ होते यांनी धंदा मांडायचा आणि त्याचा भुर्दंड फी स्वरूपात पालकांकडून वसुली करायची हे अन्यायकारक नाही का?? लहान विद्यार्थ्यांना ने आण करत असताना मोटर गाड्यांच्या आसना मधून फुस फुस असा आवाज यायला पाहिजे अर्थातच ती आसन व्यवस्था एवढी नरम असायला हवी पण विविध ठिकाणी भाड्याने देऊन त्यातील आसन यंत्रणा आता दगडासारखी मजबूत असल्याच काही पालक सांगतात.
एक एक पैसा जमवून पालक आपल्या पाल्यासाठी यथोचित सेवा मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात पंचेविस जानेवारी रोजी उमरखेड येथील इंग्रजी शाळेच्या मोटर गाडीचा अपघात होऊन एका चिमुकलीला जीव गमावा लागला यात नुकसान झाले सर्वसामान्य कुटुंबाचे. नियम सांगणारे त्याचे रक्षण करतात अनेक शहरातील त्या ठिकाणच्या आजूबाजूला वसलेल्या अनेक शाळांना कुठेतरी राजकीय लोकांचे रक्षण असते. उगीच का नियमबाह्यपणे नियमरूपी सजीव असून सुद्धा निर्जीव बनलेल्या यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे आहे. या उलट वडिलोपार्जित संपत्तीवर अर्थातच आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणारे व माकडाला सापडले हळकुंड त्याचे मांडले दुकान अर्धज्ञानी अशी एक जमात साहेबांचे समर्थन करते व प्रसंगी शुभेच्छा देऊन अभिनंदन करते. शिक्षण सम्राट सामान्यांना विविध शिक्षणाचा लाभ करून दिला अशा बिरुदावल्या लावल्या जातात यांना शिक्षण माफीया का म्हणू नये?? असे शिक्षणाचे झाले. उलट वैचारिक भिकार चोट अतिशहाणे बंडलबाज लंगड समर्थन करतात. पटत नाही म्हणायचं आणि एकमेकांच्या गळ्यात गळा घालून राहायचं खायचे आणि दाखवायची दात वेगळे आहे?? रेड्याची व्यसन ओढल्यास सगळं दाते दिसतील असे काही यांचे सुद्धा असते.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नियम, बंधने, जाचक अटी एवढ्या आहेत की या पूर्ण करण्याकरिता स्कूल बस मालकांना यश कधी येणार नाही. मात्र मोटरगाड्या आपल्या व आरटीओ साहेब आमचेच नियम सुद्धा आम्ही बनवु ते याचा अनुभव सध्या येतो आहे. या मोटर गाड्यांसाठी विशेष मोहीम राबवून ज्या मोटर गाड्या अवैध आहेत त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. जेणेकरून बोगस मोटर गाड्या अपरिपूर्ण गाड्यांना आळा बसेल. अशी मागणी जनतेची जुनी आहे मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जाते. संघटनेच्या दबावातून व दगावला झुगारून नियमाची एकरूप राहून प्रामाणिकपणा कायम ठेवून कार्य केल्यास बनावट व कायद्याची उल्लं करणारे समोर येतील.
