
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तळेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव शहराध्यक्ष तथा मार्निंग पार्क ग्रुपचे सदस्य प्रदीप ठुणे यांचा आज दिनांक १६ लावाढदिवस होता.या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक दृष्ट्या एक आगळावेगळा उपक्रम म्हणून प्रदीप ठुणे यांचे लहान बंधू स्व. संजय ठुणे यांचे दोन महिन्यापूर्वी आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी संजय हे पन्नास वर्षाचे असल्याने या वयाचा आधार घेऊन स्व. संजय यांचे स्मृतिप्रीत्यर्थ आज तलाव परिसरात स्मशानभूमीच्या काठाने वेगवेगळ्या प्रकारची पन्नास झाडं लावण्यात आली,यावेळी सर्व मित्रपरिवाराने प्रदीपभाऊ यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या व प्रदीपभाऊ आणी मॉर्निंग ग्रुप कडून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
यावेळीअरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, अंकुश मुनेश्वर रविंद्र शेराम, जानराव गिरी किशोर जुनुनकर, संजय पोपट, सुनील भामकर, राजू नागतुरे, सतिश डाखोरे विनोद नरड,दिपक आटे,श्रावणसिंग वडते, अशोक काचोळे,प्रतिक बोबडे,भरत ठुणे, किशोर सरदार, अफसर अली, अनिल डंभारे, सुरेश नेहारे, अशोक पिंपरे, रमेश माकोडे, बबलू सैय्यद, किशोर होले,भोला हिकरे,शुभम राडे प्रमोद ताकसांडे रविंद्र निळ,सागर ईंझाळकर,ओम ठुणे रामगडे सर, धनंजय सेगेकर , रामकृष्ण भोयर,समिर लाखाणी, आशिष इंगळे, निलेश पोपट,दिलीप लाकडे भानुदास राऊत अँड किशोर मांडवकर शेख रफीक यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.हा वाढदिवसाचा झाडं लावण्याचा आगळा वेगळा उपक्रम हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि समाजपयोगी असल्याने या उपक्रामाचे समाजात मित्रपरिवारात कौतुक केले जात आहे. हा मार्निंग ग्रुप नियमितपणे आपल्या मित्रपरिवाराचे वाढदिवस स्तुत्य उपक्रमातून करत असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
