
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरकवड्याकडून वडकी कडे चूरी घेऊन जाणाऱ्या टिप्परला समोरून येणाऱ्या कंटेनर ने जबरदस्त धडक दिल्याने टिप्पर चालकाच गंभीर जखमी झाला तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दिं.१ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक ४४, वर सोनुर्ली फाट्यासमोर घडली आहे.
या झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वडकी येथील दिलीप कडू यांच्या ताब्यातील एम एच ४० सीएम ८४६२ या क्रमांकाचा टिप्पर पांढरकवडा तालुक्यातील श्रीराम स्ट्रोन क्रेशर येथून चूरी घेऊन वडकी मार्गे येत असताना महामार्गाच्या एकेरी वाहतुकीमुळे विरुद्ध दिशेने पांढरकवडा कडे जात असलेल्या आर जे ११ जे डी २०८४ या क्रमांकाच्या कंटेनर ने समोरून येणाऱ्या टिप्परला जोराचे धडक दिली हा अपघात एवढा होता की या टिप्पर चे तुकडे होऊन मोठे नुकसान झाले या अपघातात या टिप्पर चालक अंकुश आसुटकर वय ४५ वर्ष राहणार दहेगाव हा गंभीर जखमी झाला आहे तर महिंद्रा उईके वय ३२ वर्ष राहणार वेडशी हा किरकोळ जखमी झाला आहे. टीपर चालक अंकुश आसुटकर टिप्परच्या केबिनमध्ये फसल्याने त्याला मोठ्या कसरतीने नागरिकांनी कॅबिन मधून बाहेर काढले तर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे दरम्यान वर्दळीचा रस्ता असल्याने अपघातानंतर काही वेळातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळतात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे पोलीस कर्मचारी आकाश कोदुसे चालक अंबीर किनाके घटनास्थळी पोहोचले व वाहतूक सुरळीत करण्यात आली असून या घटनेचा तपास वडकी पोलीस करीत आहे.
