
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खासदार चषक सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूर यांच्या वतीने “‘ विदर्भ स्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक पद्धतीने भजनी सेवकासाठी “‘ भजन सम्मेलन “‘ आयोजित केले होते तिन दिवसिय भजन सम्मेलन मध्ये विदर्भातील जवळपास ३०० भजन मंडळ यांचा सहभाग होता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा आणि प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विदर्भ स्तरिय भजन सम्मेलन नागपूर येथे आयोजित करुन भजनी सेवक यांना मानधन, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या खासदार चषक महोत्सव समिती नागपूर यांच्या हस्ते श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ श्रीरामपूर ( कोदुर्ली ) चे भजन प्रमुख , मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि सर्व भजन मंडळ यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार समाज प्रबोधन व्हावे यासाठी देशात नेतृत्व करणारे मा.नितीनजी गडकरी साहेब मंत्री भारत सरकार,मा ज्ञानेश्वर जी रक्षक,मा लक्ष्मणराव गमे, सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती यांच्या प्रेरणेतून “‘ विदर्भ स्तरिय भजन स्पर्धा “‘ यशस्वी झाली आणि सर्व भजनी सेवक म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी भजन मंडळ यांना आमंत्रित केले होते यात आम्ही राळेगाव तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर कोदुर्ली ता राळेगाव सर्व भजनी कलाकार सहभागी झाले त्यात प्रामुख्याने मधुसूदन कोवे गुरुजी सौ श्रुती देशपांडे सौ रेखा निमजे ,विष्णु ऊईके, मनिराम शाहगड, दिलीप खंडाते रमेश खन्नी दादाराव मडावी दिलीप मेश्राम कृष्णा भोंगाडे हेमंत कोवे तबला वादक देविदास राऊत हार्मोनियम वादक हर्षल वेलादे निलेश राऊत यांना सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे विदर्भ स्तरिय भजन स्पर्धा अतिशय महत्वपूर्ण, वैचारिक, सांस्कृतिक विचारांना चालना देण्यासाठी ऐतिहासिक स्पर्धा ठरली आहे
