
सहसं. : रामभाऊ भोयर
सामाजिक ,सांस्कृतिक ,कला व धार्मिक क्षेत्रात समर्पित कामगिरी करणारी मंडळी अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीमधे मोठ्या प्रमाणात सहभागी होवून
जिल्ह्याच्या तळागाळातील
अतिदूर्गम गावखेड्यातील हजारो गोरगरीब भजन गायक व अनेकविध कलाप्रकारातील कलावंताच्या हिताची कामे करण्याची धूरा खांद्यावर घेण्यासाठी पूढे येत आहेत.
आज दि.17जूलै रोजी आर्णी तालूक्याचे सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात प्रबोधनकार मनोहरराव गणपत चव्हाण रा.तेंदूळी आर्णी ह्यांची
तालूकाध्यक्ष पदी नियूक्ती करण्यात आली. आर्णि तालूक्यातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कलावंतांनी व मान्यवरांनी त्यांचे ऊत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन केले .तालूक्याच्या गावखेड्यापर्यंत संगठन बांधणी करीता गाव तिथे शाखा स्थापन करून समितीचे सदस्य नोंदणीचे कार्य करण्यास प्राधान्य देवू ,आणि कलाकारांना आर्थिक सक्षम करण्याचे व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आदरणीय सोमनाथ दादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष ह्यांचे नेतृत्वात तथा ॲड.श्याम खंडारे,राष्ट्रीय महासचीव ,आणि
मा.सिध्दार्थजी भवरे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष ह्यांचे मार्गदर्शनामधे समितीचे कार्य तालूक्यातील गाव खेडे वाडे तांड्या पर्यंत पोहचवू असे मनोगत व्यक्त केले. तालूकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्या बाबत जिल्हाध्यक्ष अविनाशजी बनसोड,जिल्हा कार्याध्यक्ष राजेशजी मडावी, वारकरी आघाडी प्रमूख हभप.दिगांबर गाडगे महाराज,ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,महासंचीव रमेश वाघमारे,जिल्हा संघटक अशोकराव ऊम्रतकर,गूरूदेव सेवा मंडळ जिवन प्रचारक तथा राळेगाव तालूकाध्यक्ष गंगाधरजी घोटेकर,दिग्रस तालूकाध्यक्ष प्रबोधनकार मनोहर पवार,ई.ऊपस्थित वरिष्ठ पदाधिका-यांचे आभार मानले.
