

सहसंपादक : – रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दि. 21 व 22 जुलै 2025 रोजी नागपूर येथील सी. व्ही. रमण मोबाईल विज्ञान प्रदर्शनीचे फिरते वाहन दाखल झाले. या माध्यमातून परिसर स्वच्छतेवर आधारित एकूण २४ विज्ञान प्रयोग व प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.या उपक्रमाचा १६८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला, तसेच विज्ञानाबाबत उत्सुकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत झाली. शाळेतील विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक या प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
या विज्ञान प्रदर्शनाचे नेतृत्व मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे यांनी केले असून, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
फिरती विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला असून, विज्ञान शिक्षणाच्या प्रचारासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
