
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना शासनाकडून साखर पुरवठा करण्यात येतो मात्र गेल्या काही महिन्यापासून राळेगाव तालुक्यातील अंत्योदय कार्ड धारकांना साखर मिळालेली नाही.
मोफत रेशन मिळत असताना फक्त एक किलो साखरेसाठी मात्र लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत आहे.
पूर्वी सर्व लाभार्थ्यांना साखर पुरवली जात होती परंतु नंतर केवळ अंतोदय लाभार्थ्यांसाठी साखर मर्यादित करण्यात आली होती त्यातही अनियमितता असल्याने तब्बल वर्षभरापासून साखरेचे वितरण झालेले नाही अंतोदय योजनेअंतर्गत प्रती कार्ड एक किलो साखर फक्त वीस रुपये किलो दराने दिली जाते गेल्या वर्षभरापूर्वी साखरेचा नियमित पुरवठा होता मात्र शासन स्तरावरूनच साखर उपलब्ध न झाल्याने सध्या साखर वाटप ठप्प असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे यामुळे साखरेचे वितरण कधी होईल याची प्रतीक्षा लाभार्थ्यांना लागून आहे.सध्या उत्सवाचे दिवस असून शासनाने साखर पुरवठा सुरू करीत नियमित साखर वाटप करण्यात यावे व अंत्योदय रेशन कार्ड धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली अंत्योदय रेशन कार्ड धारकांनी केली आहे .
गरीब कुटुंबांना बसतोय आर्थिक फटका
अंत्योदय कार्ड फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दिले जाते हे कार्ड देताना तहसीलदार शहानिशा करूनच पात्र कुटुंबांना संमती देतात शासनाने इतर लाभार्थ्यांसाठी साखर बंद केली असली तरी अंत्योदय लाभार्थ्यांची साखर बंद करण्यात आलेली नाही मात्र पुरवठा अनियमित असल्याने त्यांना वेळेवर साखर मिळत नाही शासनाने पात्रकार्ड धारकांना पूर्वीप्रमाणे शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त साखर उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे शासनाने गरीब कुटुंबीयांना गोडधोड तयार करण्यासाठी साखर वितरित करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
