
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऑपेरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव मंडळाची आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा – 2025 राबविण्यात आली. यामध्ये 4 हजार मंडळानी सहभाग घेतला असून यापैकी 21 मंडळ पात्र ठरले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी विकास मिना व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सामाजिक भान ठेऊन धार्मिक उत्सव साजरा केला पाहिजे ते आपण उपस्थित मंडळानी केले ही जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं ज्यांनी मुल्याकंन केलं त्या सर्व परीक्षकांनी आणि विशेषतः व्यस्त कार्यक्रम असतांनाही पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्गा मंडळाला भेटी देण्याचं काम चोख बजावलं त्याबद्दल त्यांच कौतुक करून सर्व मंडळानी यापुढेही सामाजिक भान ठेऊन उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले की, नवदुर्गा उत्सव म्हणजे नवंचैत्यन्याचा उत्सव हा नवचैतन्य समाजातील दुःखी कष्टकरी व दिशा भटकंलेल्यांनाही अंधारातून दूर करण्यासाठी समाजभान लक्षात घेऊन आपण सण उत्सव साजरे केले पाहिजे त्याकरिता मंडळाला प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा राबविली यामध्ये ज्या मंडळानी सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी मानले.
त्यामध्ये राळेगाव शहरातील नावलौकिक असलेल्या मंडळापैकी असलेल्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळ राळेगाव मंडळाला उपविभाग पांढरकवडा अंतर्गत प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व दोन हजार रुपये रोख प्राप्त झाले..
पुरस्कार स्वीकारतांना आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी, सुरेश गहरवाल, शेख रऊप, अमोल पंडित, वैभव बोभाटे, अंकित बोटरे व राळेगाव पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक शितल मालटे उपस्थित होत्या.
