
प्रतिनिधी//शेख रमजान
पोलीस स्टेशन बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे व बिटरगाव मंडळ अधिकारी यांनी ढाणकी नगरपंचायत निवडणूक मतदान पूर्वी कारवाई करत शनिवारी सकाळी 1.30 च्या सुमारास सोईट ते ब्राम्हणगाव रोडवर अंकित विनोद जयसवाल वय (27) रा ढाणकी व
वैभव मुंजाजी हिंगडे रा चातारी यांना अटक करून त्या जवळील देशी दारू सह टाटा सुमो गाडी जप्त केली असता त्यात देशी भिंगरी दारू चे 27 बॉक्स किमं त 103680 रु,एक वन+ मोबाईल किंमत 15000रु,टाटा सुमो किंमत 500000 रु असा एकून – 618000 रु चा मुद्देमाल जप्त मिळून आले.
सदर ची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखे यांचे मार्ग दर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे बिट जमादार रवी गिते मोहन चाटे, गोपनीय प्रकाश मुंढे,राहुल कोकरे, पो. स्टे. बिटरगाव मंडळ अधिकारी बिटरगाव गजानन सुरोशे, अक्षय शिंदे तलाठी, पंजाब सानप यांनी केली.
