
आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊईके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश..!
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उरलीसुरली ताकद आता कमी झाली असून भाजपची ताकद राळेगाव शहरात अधिक वाढली आहे.
दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे हा सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुलसिंह चौहाण, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे व शहर अध्यक्ष शुभम मुके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते चित्तरंजन दादा कोल्हे, संजय काकडे, डॉ. कुणाल भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, अरविंद फुटाणे, प्रवीण कोकाटे, प्रशांत तायडे, अनिल नंदुरकर, संदीप पेंदोर, प्रसाद ठाकरे,गणेश देशमुख, विनोद मांडवकर, अरुण शिवणकर, दिनेश गोहणे, आशिष इंगोले, संदीप तेलंगे, निखील राऊत, संदीप पेंदोर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश खुडसंगे यांच्या नेतृत्वात खालील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तानबाजी चिंचोलकर (यवतमाळ जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस – करंजी सो.)
प्रभाग क्र. ९ मधील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते नामदेवराव गवारकर, शिवदासजी राऊत, शंकर शिवणकर, प्रमोद भटे, सुनील मरसकोल्हे, निलेश जुनघरे, किशोर रोहनकर, महादेव लांबाडे, गणेश चौधरी, सतीश गवारकर, संजय शिंदे, गौरव केवटे, गजानन तिवसे, घनश्याम शिंदे, अभिजित शिवणकर, धनराज चामलाटे, सौरभ पातकमवार, सुमित ठाकरे, आशिष तिवसे, आकाश भोकरे.
राळेगाव शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा मुख्य ध्यास आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासकामांची गती कायम राखण्यासाठी आणि केंद्र व राज्यातील जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि शहराच्या आधुनिक विकासासाठी भाजप हाच सक्षम पर्याय आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही राळेगावच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू.
— प्रकाश खुडसंगे
या पक्षप्रवेशामुळे राळेगाव शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पक्षसंघटन मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल अशी प्रतिक्रिया दिली.या पक्षप्रवेशानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वात नवचैतन्य निर्माण झाले असून, राळेगाव शहरात भाजपचा जनाधार आणखी वाढेल, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
