
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका अंतर्गत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव द्वारा संचालित जनरल चॅम्पियनशिप या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या खेळामध्ये विद्यार्थ्यांना मैदानावर उतरवून प्रत्यक्ष मेहनत करून घेतली.त्यानंतर श्री बोर्डे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.श्री कांबळे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण केला.या सोबत श्री पांडे सरांनी मेहनत घेतली.या सर्व खेळाडूंवर शाळेचे मुख्याध्यापक श्री कचवे सर अथक परिश्रम घेतले. या सर्व स्तरावर नियोजन आखण्याचे काम वडकी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री वैरागडे सरांनी करून वडकी केंद्राला राळेगाव पंचायत समितीची जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली.या अतिशय महत्त्वाच्या कार्यात बोरी शाळेचे मुख्याध्यापक श्री इंगोले सरांनी सहकार्य केले.या खेळामध्ये सहभागी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत असून तालुक्यातून व केंद्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
