
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्यामुळे कापसाचे भाव कोसळतील असे सर्वांना वाटत होते पण आखाती युद्धामुळे किंवा इतरही काही परिस्थितीमुळे ही भीती फोल ठरली असून सद्यस्थितीत कापसाचे भाव हे सीसीआयच्या भावापेक्षा वाढलेले आहेत राळेगावच्या बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कापसाला आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहेत एक-दोन दिवसांपूर्वी हाच दर आठ हजार 240 रुपये होता सीसीआयच्या खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना आपला कापूस सीसीआयला विकता आला नाही त्यांना सीसीआयचे स्लॉट मिळाले नाहीत आणि अशा स्थितीत सी सी आय ने आपली कापूस खरेदी बंद केली सीसीआय ने कापूस खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्याला आपले नुकसान झाले असे वाटत होते मात्र परिस्थिती वेगळी झाली सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्यावरती कापसाचे भाव कमी होण्याऐवजी वाढले चांगल्या प्रतीच्या कापसाला आज आठ हजार दोनशे रुपये पर्यंत दर मिळत आहेत जो अलीकडच्या काळातील सीसीआयच्या दरापेक्षा अधिक आहे अलीकडच्या काळात सीसीआय 8010 रुपये क्विंटल ने चांगल्या प्रतीचा कापूस विकत घेत होता म्हणजेच सीसीआयच्या दरापेक्षा अधिक दर सद्यस्थितीत चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळत आहेत गठानी तसेच सरकीत आलेली तेजी सोबतच आखाती युद्धामुळे सुताची मागणी वाढणार व त्यामुळे कापसाचे भाव वाढले असे सुद्धा काहींचे म्हणणे आहेत आजही राळेगाव बाजार समितीमध्ये दररोज 200 ते 250 वाहनांमध्ये कापूस विक्रीसाठी येत आहे दररोज सात ते आठ हजार क्विंटल कापूस राळेगाव बाजार समितीच्या माध्यमातून विकला जात आहे यातील 70 टक्के कापूस हा मागचा आहेत तर 30 टक्के कापूस हा पहिला येत आहे पूर्ण एप्रिल महिना अशी स्थिती कायम राहील असे सध्या तरी चित्र आहेत यावर्षी राळेगाव बाजार समितीच्या माध्यमातून आठ लाख 76 हजार क्विंटल कापसाची विक्री झाली ज्यामध्ये तीन लाख 12 हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला तर पाच लाख 64 हजार क्विंटल कापूस खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितच या भाव वाढीचा फायदा होणार आहेत अजूनही 30% शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचा कापूस असल्याचे समजते
