
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी राज्य शासनाच्या वतीने खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी व्यवस्था केली असून आज दिनांक २०/०५/२०२६ रोज बुधवारला ज्वारी खरेदी करण्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय गोदाम बसस्थानकाजवळ रितसर उद्घाटन करण्यात आले शासनाचा हमीभाव ३६९९ रूपये जाहीर झाला असून शेतकऱ्यांनी आपला माल बसस्थानकाजवळील शासकीय गोदाम येथे आणावा असे आवाहन करून खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले यांनी काटा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर सेंटरवर ज्वारी प्रथम आणणारे सोनुर्ली येथील शेतकरी सुभाष नारायण भोयर यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ही योजना जिल्हा मार्केटिंग अधिकारी यवतमाळ विजय गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून त्यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, संचालक श्रीधर थुटुरकर सर, संचालक विनोद भोकटे, संचालक अशोक काचोळे, संचालक कवडूजी कांबळे, संचालक प्रशांत बहाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील, पुरवठा निरीक्षक संघप्रिय भवरे गोदाम व्यवस्थापक शुभम वानखेडे, सहाय्यक निबंधक डोंगरे साहेब, संस्थेचे व्यवस्थापक संजय जुमडे लेखापाल गणेश हिवरकर रोशन शिवरकर गौरव आत्राम, यांच्या सह अनेक शेतकरी व तसेच मापारी अनिल गुजरकर उपस्थित असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
