
राजुरा शहरातील राजीव गांधी चौकालगत असलेल्या रमेश झंवर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी 29 नोव्हेंबर लां रात्री प्रवेश करीत सोने व चांदीचे दागिने व रोज असा एकूण 3 लाख 49 हजारांच्या रकमेवर असा डल्ला मारला.
एका कार्यक्रमासाठी रमेश झंवर हे नागपूरला गेले होते त्यामुळे संधीचा फायदा घेत चोरांनी संधी साधली.या संबंधी झंवर यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा
