


आज दि. 6. डिसेंबर पुर्ण जगात आणि आपल्या भारतात साजरा होतो आहे. त्याच प्रमाणे चिमुर तालुक्यातील मासळ गावामध्ये मोठ्या उत्साहाने दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महापरिनिर्वाण दिन मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला सोशल डिस्टनसिंग चा विचार करता हा कार्यक्रम साजरा करण्यात आला गावातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहकार्य केले आणि गावातून मोठ्या उत्साहात द्वीप प्रज्वलीत करून मेणबत्ती हातात घेऊन रॅली काढण्यात आली . या कार्यक्रमात उपस्थित बौद्ध पंच कमिटी चे अध्यक्ष द्वारका मेश्राम रंजनाताई पाटील वनीता गनवीर कवडु दडमल सुनिल सुर रामदास पाटील लोकमत ग्रामीण पत्रकार प्रकाश पाटील नितेश गनवीर व अन्य उपस्थित होते हा कार्यक्रम सुखरूप प्रारंभ झाला बौद्ध पंच कमिटी चे आभार मानले.
प्रतिनिधी राहुल कोयचाडे,चिमूर
