
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी
नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही निकाल लागलेला नाही. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्याप्रमाणेच या भारत बंद करिता आष्टी येथील सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी व लहान व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पंदीलवार, पंकज अल्लुरवार, संदीप बोर्लावार, अभिजित कोलपाकवार, दीपक पांडे, संजय पंदीलवार यांच्यासह इतर व्यापारी तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी आष्टी बंद ठेउन शेतकऱ्यांना पाठींबा दिलेला आहे.
